top of page

दु:ख निसर्गाची
देणगी आहे.
आनंदी राहणे ही
आपली निवड आहे.

About

आनंदमार्गी
प्रत्येक प्रयत्नात झेंडा गाडायलाच हवा का?
प्रत्येक धावणाऱ्यानं नंबर काढायलाच हवा का?
एकाच झेपेत का आकाशाला भिडायचं?
का सतत आयुष्याशी शत्रूगत लढायचं?
का गुणवत्तेला कुणाबरोबर तरी जोखायचं?
का आपल्या यशाला स्पर्धेनं माखायचं?
का सर्वोत्तमाच्या ओझ्याखाली सतत जगायचं?
का अदमास घेत घेत घाबरून वागायचं?
का सतत ध्येयापर्यंतच पोचायचा ध्यास?
कधीतरी तरी अनुभवूया, हा सुंदर प्रवास
स्पर्धा जीवघेणी आहे, म्हणून धावतच राहणंही योग्य नाही. आयुष्यात गुंते आहेतच. पण त्यातून मार्गही काढता येतात. हा विश्वास टिकवून ठेवायचाय. सकारात्मक विचारांची पेरणी करत करत आनंदाचे सप्तरंग फुलवायची आहेत.
हेच ध्येय आहे. हाच ध्यास आहे.

Speaking
bottom of page